नितीन तावडे
उस्मानाबाद  :-  उस्मानाबाद रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन तावडे तर सचिवपदी सुनील गज्रे यांची निवड करण्यात आली आहे. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी भाग्यश्री गांधी तर सचिवपदी दीपिका मेहता यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता शहरातील जिजाऊ चौक येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 
स्मानाबाद येथील रोटरी क्लबला 25 वर्षे पूर्ण होत असून, रौप्यमहोत्सवी वर्ष 2014-15 साजरे केले जात आहे. आजपर्यंत रोटरी क्लबने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. शनिवारी आयोजित पदग्रहण समारंभास पुणे येथील 'साधना' साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित राहणार आहेत. पदग्रहण अधिकारी म्हणून उपप्रांतपाल भुजंग शेट्टी उपस्थित राहणार आहेत. तरी रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभास शहरासह परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरीचे मावळते अध्यक्ष रमेश सारडा, सचिव प्रदीप मुंडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा आशा देशमुख, सचिव भाग्यर्शी गांधी यांनी केले आहे. 

 
Top