उस्मानाबाद -: येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.प्रशांत गुणवंतराव चौधरी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या तर्फेक दि..16 जुलै रोजी पी.एचडी पदवी प्रदान केली.
प्रा.प्रशांत चौधरी यांनी ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी कादंबर्यांची नाट्यरुपांतरणे-एक चिकित्सक अभ्यास’ (निवडक कलाकृतींच्या संदर्भात) या विषयावर शोध निबंध सादर केला होता. या संदर्भात त्यांना तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एस.एम.देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रा.चौधरी यांना पी.एचडी. मिळाल्याबद्दल तपस्वी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव ऍड.मिलिंद पाटील, शेषाद्री डांगे, डॉ.अभय शहापूरकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनार साळुंके, डॉ.मनिष देशपांडे आदींसह सर्व सहकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
