पांगरी (गणेश गोडसे) : उक्कडगांव गावठानमधील वीज बिल वसुली व गळती कमी झाल्यास पांगरी (ता. बार्शी) या निमशहरी गावातील भारनियमन कमी होऊ शकते, अशी माहिती विद्युत वितरण कंपनीचे बार्शी विभागाचे ग्रामिण सहाय्यक अभियंता कोंडगुळी यांनी दिली.
पांगरी गाव गावठान वाहिनीस जोडलेले असल्यामुळे सदर गावास सिंगल फेझिंग योजना लागु होत नसल्याची गंभिर बाबही या माहिती अधिकारामुळे उजेडात आली आहे. पांगरी येथील भारनियमन विज गळती, विज बिल वसुली, धकबाकी, भारनियमनाची नियमावली आदी विज वितरणासंबंधीची माहिती येथील समाधान पोफळे यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे वितरण कंपनीकडे मागितली होती.
विज वितरण कंपनीतर्फे देण्यात आलेल्या माहिती अधिकाराच्या पत्रात म्हटले आहे की, पांगरी येथील विज वितरण कंपनीच्या केंद्रातुन पांगरी परिसरातील अनेक गांवांना विज पुरवठा केला जातो. पांगरी गांव पांगरी केंद्रातील उक्कडगांव गावठान वाहिनीवर जोडलेले आहे. या वाहिनीवर पांगरी व्यतिरिक्त उक्कडगांव, पांढरी, चिंचोली, ढेंबरेवाडी, घोळवेवाडी आदी अनेक गावे जोडलेली आहेत. भारनियमन वर्ग हा विज बिल वसुली व गळती या बाबीवर अवलंबुन असते. उक्कडगांव वाहिनीची विज बिल वसुली 88 तर विज गळती 54 टक्के असल्यामुळे गावठानची वर्गवारी खालावलेली आहे. उक्कडगांव गावठानची विज बिल वसुली वाढल्यास व गळती कमी झाल्यास तात्काळ पांगरीतील भारनियमन कमी होऊ शकते असेही पत्रकात म्हटले आहे. तरी विज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी थकित विज बिल वसुली करून पांगरी गावाला सुरळीत विजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी आहे.