बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील रोटरी क्लबच्या वतीने मोफत खिचडी व शिरा देऊन अन्नपूर्णा दिन साजरा करण्यात आला. ऐनापूर मारुती मंदिर येथे ज्येष्ठ व्यापारी बाबासाहेब कथले यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष गौतम कांकरिया, संदिप सुराणा, अभय कुंकूलोळ, अतुल गुंडेवार, अजित कुंकूलोळ, बाळासाहेब तातेड, रविकांत करवा, अभिजीत सोनिग्रा आदी उपस्थित होते.