ताज्या घडामोडी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण (दलित मित्र) पुरस्कार शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शीतील नवनाथ चांदणे यांना संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख १५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी शिवाजीराव मोघे, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सामाजिक राज्यमंत्री संजय सावकारे, खासदार धनंजय महाडिक, यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, पुरस्कार विजेत्यांना दरमहा २ हजारांची पेन्शन तर शिवाजीराव मोघे यांनी पुरस्काराची रक्कम वाढविण्याची घोषणा केली.
    अशोक शेंडगे, दादासाहेब देवकुळे, बाळासाहेब तुपसमिंदर, राजू थोरात, प्रकाश बगाडे, अनंता बगाडे, देवा बगाडे, मल्हारी पाटुळे, सुनिल दाडे, माणिक पवार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
 
Top