बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: साहित्य चळवळीसाठी अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागतो. कविता ही अंतर्मनातून येणारी गोष्ट आहे, यामध्ये कोणाची मक्तेदारी नसते, जो जीव लावतो त्यालाच कविता गवसते, यमक, श्लेष, प्रास एवढ्याचा उपयोग नसून परिणामासाठी काळजाचं रक्तही व्हायला हवं, मेघदूत म्हणजे परिसस्पर्शाने सोनं आणि कौतुकासाठी मन आभाळाएवढं लागतं असे मत सोलापूर येथील प्रख्यात कवी माधव पवार यांनी व्यक्त केले.
बार्शीतील कवी कालिदास मंडळाच्या वतीने मागील बावीस वर्षांपासून देण्यात येणारा मेघदूत पुरस्कार चंद्रपूर येथील कवी शेष सुदाम देऊरमल्ले यांच्या लाल दिव्यातील नग्नसत्य या काव्यसंग्रहास तर टेंभूर्णी येथील कवी हरिश्चंद्र पाटील यांच्या हुंदके मातीचे या काव्यसंग्रहास, याबरोबरच ज्येष्ठ साहित्यीक श.मा.पाटील यांना विशेष साहित्य सेवा सन्मान देऊन गौरविण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी सहयोगी स्थानीक रहिवासी मंडळाचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, वायुपुत्र नारायण जगदाळे, ज्येष्ठ सहित्यीक प्रा.डॉ.सूर्यकांत घुगरे आदी उपस्थित होते.
कै.दगडू बळी मस्तुद यांच्या स्मरणार्थ डॉ.कृष्णा मस्तूद यंाचेकडून व डॉ.सूर्यकांत घुगरे यांच्या वतीने मेघदूत पुरस्कार, तर कै.डॉ.कुंदाताई जगदाळे यांच्या स्मरार्थ नारायणराव जगदाळे यांच्याकडून विशेष साहित्य पुरस्कार देण्यात येतात.
यावेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या काव्यवाचन स्पर्धेत सूर्याजी भोसले, सुनिता मुंढे, रमेश वडवराव, रामभाऊ अंधारे, शशिकला गुंजाळ यांना कै.नागनाथ पानगांवर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक अध्यक्षा सुमन चंद्रशेखर यांनी केले, परिचय मुकूंदराज कुलकर्णी, रामचंद्र इकारे, प्रकाश गव्हाणे, शब्बीर मुलाणी, दत्ता गोसावी यांनी केला. सूत्रसंचलन अनुराधा केसकर, शारदा पानगावकर यांनी तर आभार रामचंद्र इकारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयसिंग रजपूत, अनंत कुलकर्णी, आबा घावटे, चनबसवेश्वर ढवण, रमाकांत लिमकर, सविता गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.