उस्मानाबाद :- स्वर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात सामान्य नागरिकांशी निगडीत असलेले प्रश्न सोडविण्यात येत आहेत. प्रत्येक तहसीलच्या अंतर्गत असणा-या विविध मंडळात त्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. फेरफार अदालत, सातबारा उतारा, विविध प्रमाणपत्रांचे वाटप अशा माध्यमातून नागरिकांचे समाधान या मेळाव्यातून केले जात आहे. प्रशासनाचा हा सकारात्मक पुढाकार नागरिकांसाठी उपयोगाचा ठरत असल्याने त्यांच्यात समाधान व्यक्त होत आहे.
नागरीकांना त्यांच्या कामासाठी तालुका पातळीवरील कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रशासनाविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा बदलण्यासाठी समाधान मेळाव्याची संख्या वाढविण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिली. ते स्वत:ही विविध ठिकाणच्या समाधान मेळाव्यास उपस्थित राहीले. यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक गतीमान होण्यास मदत झाली. विविध तालुक्यातील या उपक्रमाच्या आयोजनाचे नियेाजन डॉ. नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी केले.
नागरिकांची कामे गाव व महसूल मंडळ पातळीवर व्हावे, त्यांच्या अडचणीची सोडवणूक ग्रास्तरावरच व्हावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्य केला आणि त्यातून समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात येवू लागले. विविध विभागांशी निगडीत योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळावा हा हेतू या उपक्रमाचा आहे. हा उदेश सफल झाल्याचे चित्र विविध ठिकाणी आायोजित केलेल्या या समाधान मेळाव्यातून दिसत आहे.
महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी, शिक्षण, आरोग्य, पशुसंवधन, पोलीस ,परिवहन, भुमी अभिलेख अशा विविध विभागांच्या योजना व त्यांचे फायदे थेटपणे नागरीकांना या उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात होत आहेत. इंदिरा आवास योजना, रमाई घरकुल योजना, दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र वाटप, ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रमाणपत्र वाटप ही या वेळी करण्यात येत असल्याने मंडल कार्यक्षेत्रातून होणा-या नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
शिक्षण विभागाशी निगडीत अपंग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देणे, अल्पदृष्टी विद्यार्थ्याची तपासणी, शालेय पोषण आहार व पूरक आहाराबाबत मार्गदर्शन करणे आदि या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. कृषी विभागांतर्गत शेतकरी गट स्थापनेबाबत मार्गदर्शन, जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रमातर्गत माती नमुने तपासणी, शतकोटी वृक्ष लागवड, पीक विमा आदिबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशु आरोग्य तपासणी व लसीकरण, वासरांना जंतनाशक याशिवाय विविध योजनांविषयची माहिती देण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने नेत्र तपासणी, रक्त तपासणी, सावित्रिबाई फुले कन्या कल्याण योजना माहिती, हिमोग्लोबीन तपासणी, किशोरवयीन मुलींची रक्त व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येत आहे. याचा लाभ मंडळ परिसरातील महिलांना होत आहे. राज्य वीज वितरण कंपनीमार्फत वीज बिल दुरुस्ती, घरगुती वीज जोडणी, राजीव गांधी ग्रामीण विदयुतीकरण योजनेअंतर्गत बीपीएल लाभार्थ्यास वीज जोडणी आदी विविध योजनांची थेट अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात येत असल्याने नागरिकांना त्याचा थेट फायदा मिळत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबाबत सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या अडचणी त्या त्या स्तरावर सोडवा,असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.