सोलापूर -: जिल्ह्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, फौजदारी न्यायालय येथील न्यायालयामध्ये विशिष्ट खटल्याकरीता 16 विशेष सहायक अभियोक्त्यांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करावयाची आहे. इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हादंडाधिकारी कार्यालयातील दुय्यम चिटणीस शाखेत दिनांक 5 ऑगस्ट 2014 पूर्वी पोहोचतील अशा रितीने पाठवावेत.
या पदासाठी अर्जदाराचे संपूर्ण नांव व पत्ता, जन्मदिनांक व ठिकाण तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी संपादन केलेली असावी तसेच अर्जदारांनी कमीत कमी 5 वर्षाचा वकीली केलेली असावी. कोर्टातील कामाचा अनुभव असावा, अर्जदार हा अडव्होकेट म्हणुन सभासद असावा, अर्जदाराचे वय सर्वसाधारण उमेदवारासाठी 33 तर मागासवर्गीयासाठी 38 पेक्षा जास्त नसावे. अर्जदार मागासवर्गीय असल्यास सक्षम अधिका-याने दिलेल्या जातीच्या दाखल्याची सत्यप्रत जोडावी. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेचे व इतर आवश्यक बाबींच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित करुन जोडाव्यात. तसेच या पदाबाबत यापूर्वी जिल्हादंडाधिकारी कार्यालयात अर्ज केला असेल अशा उमेदवारांनी अर्ज सादर करु नयेत. अपूर्ण अर्जांचा िवचार केला जाणार नाही असे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.