वैराग (महेश पन्‍हाळे) :- पवित्र रमजान महिन्‍यानिमित्‍त वैराग (ता. बार्शी) येथील जुम्‍मा मशिदीमध्‍ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी राज्‍याचे पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री त‍था सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांची प्रमुख उपस्थिती होती.
         वैरागमधील जुम्‍मा मशीद खडकपुरा येथे हिंदू-मुस्‍लीम बांधवासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी मौलाना अब्‍बास कादरी, मौलाना आसिफा पाशा, मौलाना कमाल पाशा यांच्‍यासह सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल, जि.प. पक्षनेते मकरंद निंबाळकर, पं.स. सदस्‍य निरंजन भूमकर, तालुकाध्‍यक्ष कुमार पौळ, अरुण सावंत, युवराज काटे, व्‍यंकटेश ढेंगळे-पाटील, नितीन मोरे, सुधाकर आवारे, सादिक शेख, बाळासाहेब भूमकर, आयुब शेख आदीजण उपस्थित होते.
 
Top