वैराग (महेश पन्‍हाळे) :- जननायक माजी आमदार स्‍वर्गीय चंद्रकांत (नाना) निंबाळकर यांच्‍या प्रथम पुण्‍यस्‍मरणानिमित्‍त वैराग (ता. बार्शी) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या भव्‍य रक्‍तदान शिबीरामध्‍ये 411 रक्‍तदात्‍याची रक्‍तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. या रक्‍तदान शिबीरामचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
       वैरागसह परिसरातील जनसामान्‍याचे लोकप्रिय नेते माजी आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्‍या निधनाला एक वर्ष पुर्ण झाले. त्‍या निमित्‍ताने प्रथम पुण्‍यस्‍मरणाचे आयोजन करुन प्रेरणादिन साजरा करण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणून वैराग-मोहोळ रोडवरील शारदादेवी प्रशालेमध्‍ये रक्‍तदान शिबीर पार पडले. या शिबीराचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्‍यक्ष विश्‍वास बारबाेले उपस्थित होते. तसेच जिल्‍हा परिषदेचे पक्षनेते मकरंद निंबाळकर, उपसभापती केशव घोगरे, जि.प. चे विरोधी पक्षनेते संजय पाटील, सरपंच संतोष निंबाळकर, पं.स. सदस्‍य भाऊसाहेब काशिद आदीजण उपस्थित होते.
       या रक्‍तदान शिबीरामध्‍ये बार्शीची श्रीमान रामभाई शहा रक्‍तपेढी, सोलापूरची डॉ. हेडगेवार रक्‍तपेढी व अतहर रक्‍तपेढींनी सहभाग नोंदवला. या रक्‍तपेढ्यांमधून डॉ. माधुरी काळे, क‍पिल हिंगमिरे, सुप्रिया लगदिवे, प्रियंका निंबाळकर, डॉ. मधुकर देशमुख, नितीन कवठेकर, अमृता चव्‍हाण, मारुती बंडगर, संगिता म्‍हेत्रे, डॉ. अजहर पठाण, शाकीर हकीम, फरीदा शेख, मौलाली शेख आदी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
      बुधवारी सकाळी दहा वाजता रक्‍तदान शिबीराला सुरुवात झाल्‍यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिबीर सुरु होते. वैराग शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांनी रक्‍तदान शिबीरात सहभाग नोंदविला.    
 
Top