बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील संत श्री गुलाबराव महाराजांच्या पालखीचे बार्शीत भव्य स्वागत करण्यात आले. सालाबादाप्रमाणे यंदाही पालखीसोबत असलेल्या शेकडो वारकर्‍यांचे अलिपूर रोडवरील वायुकळे मळ्यात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात आदरातिथ्य करण्यात आले.
   पालखी मळ्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक मंडळ व श्रीकृष्ण चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वारकर्‍यांना महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. अलिपूर रोड परिसरातील शेकडो भाविकांनी पालखी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी मंदिरात गर्दी केली होती. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या प्रेरणेतून निघालेली ही दिंडी पालखी घेऊन विठ्ठल भेटीला जात असते. अनेक वर्षांपासून येथील वायकुळे मळ्यात महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय ती पुढे जात नाही. यंदाही वारकर्‍यांसह विठ्ठल नामाचा गजर करीत ती बार्शीत दाखल झाली. १८८१ ते १९१५ या कालखंडात संत गुलाबराव महाराजांनी कोणतेही शिक्षण घेतले नसताना व अंधत्त्व असतानाही मराठी, हिंदी, संस्कृत भाषेत १३३ ग्रंथांची रचना केली आहे. सकाळी सात वाजता अलिपूर रोडवर ज्येष्ठ नागरिक व वायकुळे परिवाराच्या वतीने संत गुलाबराव महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रा.पंढरीनाथ पायघन, उपाध्यक्ष ठाकरे सर , सचिव शिवाजी ठोंबरे, साळुंखे, निवृत्त तहसीलदार मदनराव वायकुळे, यशवंत वायकुळे, क्रीडा शिक्षक समीर वायकुळे, सौरभ वायकुळे, तेजस गिलबिले तसेच पालखीचे प्रमुख संजय शेडे महाराज, दादा भटकर आदी उपस्थित होते.
 
Top