बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन नवनाथ निवृत्ती चांदणे यांचा केलेला सन्मान हा सच्चा कार्यकर्त्याचा सन्मान असल्याचे मत पालकमंत्री दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
मार्केट यार्ड येथे चाळणी, वारणी कामगारांच्या वतीने सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यापारी बाबासाहेब कथले, असो.अध्यक्ष मल्लिनाथ गाढवे, वारणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बगाडे, मातंग एकता आंदोलनाचे धनंजय ढावारे, आनंद चांदणे, अशोक शेंडगे, बाळासाहेब तुपसमिंदरे, राजू थोरात, पंडित चव्हाण, आत्माराम साठे, लाला पवार, सुनिल साठे, शाम शिंदे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना.सोपल म्हणाले, मागासवर्गीय समाजासाठी राबविण्यात येणार्या घरकुल योजना, कामगारांना पेन्शन, भुमीहिनांना जमीन आदी विविध योजना नवनाथ चांदणेंसारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार. बाबासाहेब कथले म्हणाले, वारणी, चाळणी कामगार यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत.
याप्रसंगी बोलतांना नवनाथ चांदणे म्हणाले, लहानपणापासूनच समाजातील थोरामोठ्यांनी नगरसेवकपदावर काम करण्याची संधी दिली. सामाजिक चळवळीमध्ये समाजाने माझ्यावर विश्वास टाकला म्हणूनच हा सन्मानदेखिल प्राप्त झाला आहे. हा माझा एकट्याचा सन्मान नसून सर्व समाजाचा आहे. यापुढील काळात अधिक जोमाने काम करुन समाजाच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी म्हटले.