उस्मानाबाद -: प्रशासकीय काम करताना अधिकारी आणि कर्मचारी यांनी तणावमुक्त राहणे आवश्यक असते. यासाठी गरज असते ती सकारात्म्क दृष्टीकोनाची. ही गरज ओळखून मंगळवारी महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांचेसाठी ताणतणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक मानसिकता या विषयावरील मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. तेरणा महाविद्यालयातील प्राध्यापक आणि वक्ते डॉ. जर्रा काझी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन, न्यायालयीन कार्यपध्दती, महसूल कार्यपध्दती, प्रशासकीय इमारत आणि पुरवठाविषयक बाबी आदीबाबत दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. येथील जिल्हा परिषद सभागृहात सकाळी डॉ. काझी यांच्या ताणतणाव व्यवस्थापन विषयावरील व्याख्यानाने या कार्यशाळेस सुरुवात झाली.
तत्पुर्वी यावेळी अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, उपविभागीय अधिकारी रविंद्र गुरव (उमरगा) आणि सचिन बारवकर (कळंब), ॲड टेळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी डॉ. काझी यांनी सकारात्मक विचारांव्दारे मनातील नकारात्मक भावना दूर होते आणि आपल्या उदिष्टपूर्तीसाठी ते सोपे जाते असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिपू सूलतान यांची उदाहरणे देत उपस्थितांना जणू मानसिक उभारी घेण्यासाठीची प्रेरणाच दिली.
यावेळी उस्मानाबादचे तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह इतर तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या दोन दिवसीय कार्यशाळेत आज पहिल्या दिवशी फौजदारी प्रक्रिया संहिता, कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार व कार्यपध्दती या विषयावर ॲड. वैशाली धावणे, पुरावे दाखल करण्याच्या पध्दती व फेरफारविषयक बाबी विषयावर ॲड. कवठे, दिवाणी प्रक्रिया संहिताप्रमाणे न्यालयीन कार्यपध्दतीत महसूल अधिकाऱ्यांकडून करावयाची कार्यपध्दती विषयावर ॲड. प्रतीक देवळे, संक्षिप्त चौकशी व सखोल चौकशी विषयावर ॲड. टेळे, पंचनामा व त्याचे महत्व विषयावर जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

.jpg)