उस्मानाबाद :- राष्ट्रीय एकात्मिक कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्हयाने चांगली कामगिरी बजावण्यासाठी ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे मातृत्व संवर्धनदिन साजरा करण्याची सूचना जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली.
    नुकतीच डॉ. नारनवरे यांनी या कार्यक्रमाचा जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयपाल  चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर हाश्मी, एनआरएचएमचे प्रकल्प संचालक श्री. गाडेकर यांच्यासह तालुका वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधीक्षक यांची यावेळी उपस्थिती होती.
    डॉ. नारनवरे म्हणाले की, जिल्ह्यात आरोग्यविषयीच्या योजनांची चांगली अंमलबजावणी  होणे आवश्यक आहे. सरकारी रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या गरोदर मातांची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी चांगली सेवा देणे आवश्यक आहे. मातृत्व संवर्धन दिनासारखे कार्यक्रम आयोजित करुन हे करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
    प्रत्येक तालुक्याला एएनएम निहाय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय उदिष्ट ठरवून दिले पाहिजे. नॉर्मल (साधारण) प्रसूतीचे प्रमाण वाढले पाहिजे, त्यासाठी गरोदर मातांना आवश्यक तो सल्ला आणि मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
    आपल्या कामांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व वैद्यकिय कामात  निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही तसेच पन्नास टक्केपेक्षा कमी उद्दिष्टपूर्ती असणाऱ्या डॉक्टरांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. नारनवरे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले.       
डॉ. नारनवरे यांच्या आरोग्य विभागाला सूचना
    उस्मानाबाद,दि.22- राष्ट्रीय एकात्मिक कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्हयाने चांगली कामगिरी बजावण्यासाठी ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे येथे मातृत्व संवर्धनदिन साजरा करण्याची सूचना जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली.

Top