बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील बस स्थानकावर मागील अनेक वर्षांपासून प्रवाशी व यात्रेकरुंची आर्थिक लूट, असुविधा, अस्वच्छता आदी प्रकार राजरोजपणे सुरु होते. रात्री अकराच्या नंतर मनमानीपणे सदरचे शौचालय बंद ठेवण्यात येत होते तक्रारीनंतर आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेतल्याने प्रवाशांची लुट थांबविण्यात आली आहे.
सदरच्या गैरसोयीमुळे रात्री अपरात्री दूरहून आलेल्या प्रवाशांना शौचालयासाठी कुठेही सोय नसल्याने नाईलाजास्तव महागड्या लॉजमध्ये अथवा जागा मिळेल तेथे घाण करण्याशिवाय पर्याय रहात नसे. यातील दुसरा पर्याय जास्त मोठ्या प्रमाणात वापरला जात यामुळे परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता व प्रवाशी तसेच हंगामी भाविकांची गैरसोय होत होती.
प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनंतर पत्रकारांनी तात्काळ स्वत: लेखी तक्रार करुन आगार व्यवस्थापकांना जागेवर पंचनामा करण्यास सांगीतले. यावेळी नागरिकांकडून दिड ते दोन रुपयांऐवजी पाच रुपये शौचालयासाठी वसूली केले जात असल्याचे दिसून आले. प्रवाशांकडे सुट्ट्या पाच रुपयांचा प्रश्न असल्यास दहा रुपये घेण्यात येत होते. सुट्टे असेल तरच या नाहीतर निघा असे सांगून अडवणूकदेखिल केली जात होती. तसेच चोवीस तास शौचालय सुरु ठेवणे बंधनकारक असतांना रात्री अकरानंतर बंद करण्यात येत होते. शौचालय चालकाला वाहतूक व्यवस्थापकांच्या साक्षीने कॅमेरामध्ये रंगेहाथ टिपण्यात आले, यावेळी पैसे देणार्या प्रवाशांनी समोरासमोर जादा पैसे वसूल केल्याचे सांगीतल्यावर चालक गयावया करत हातापाया पडू लागला. यावेळी आगार व्यवस्थापकांसमोर लेखी म्हणणे देण्यास तसेच त्या ठिकाणी मोठ्या अक्षरात नियमानुसार आकारणी करण्यात येणारी रक्कम वापरकर्त्यांना दिसेल असा फलक लावण्याचे बंधन घालून सोडण्यात आले. तक्रारीच्या अनुषंगाने आगार व्यवस्थापक श्री कदम व श्री हांडे म्हणाले, याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात येईल व संबंधीतावर वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल, वसूली करण्यात येणार्या रकमेचा फलक तात्काळ लावण्याचे सांगण्यात आले आहे.