उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या कृषि विभागाव्दारे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांच्या कुटुंबीयांनी आपल्या गावाशी संबंधित कृषि पर्यवेक्षकांची किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन आपले प्रस्ताव त्वरीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
या योजेअंतर्गत रस्ता/ रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत पावणे, जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडुन मृत पावणे, खून, उंचावरुन पडुन मृत्यू पावणे, सर्प/ विंचूदंश, दंगल, जनावर चावल्यास व हल्ल्यात जखमी होवून मृत पावणे शव न मिळणे, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या आदि अपघातामध्ये मृत्यु झालेल्या आणि 50 टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना अथवा त्यांच्या वारसांना अनुक्रमे एक लाख व 50 हजाराची मदत दिली जाते.