बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कर्मवीर डॉ.जगदाळे मामा यांनी बार्शीला शिक्षणाचे माहेरघर बनविले, शिक्षणाची प्रतिकुल परिस्थिती असतांना बोर्डींगपासून सुरुवात केली आज ४५ हजार विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. बार्शीसारख्या ठिकाणी वैद्यकिय महाविद्यालय असावे हे डॉ.मामासाहेब जगदाळे यांचे स्वप्न आजही अधुरे राहीले आहे त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
राज-विजय व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील शिक्षक व साडेतीनशे गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह शब्द भाषांतर पुस्तिका देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजेंद्र राऊत, संतोष निंबाळकर, रावसाहेब मनगिरे, उमेश काळे, केशव घोगरे, कौसल्या माळी, मधुकर फरताडे, बाबा कापसे, अरुण बारबोले, अशोक सावळे आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, दरवर्षी चंागल्या गुणांनी अनेक विद्यार्थी यशस्वी होतात परंतु नोकरीसाठी अनेक ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत असल्याने मनामध्ये वेगळ्या प्रकारची चिंता वाटते. विद्यार्थ्यांचे पालक अत्यंत कष्टाने आपल्या मुलाला शिक्षण देतात परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नोकरीच्या वेळी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा समस्येवर उपाय म्हणून आपण उद्योगाचे जाळे निर्माण करणार आहे.
----------