पंढरपूर :– पर्यावरणातील बदलामुळेच दुष्काळ, मोठ्या प्रमाणावर गारपीट, अतिवृष्टी आदी आपत्ती येत आहेत त्यामूळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वसामान्य माणसांपर्यंत जनजागृती करण्याचा पर्यावरण दिंडीच्या माध्यमातून केला जाणारा स्तुत्य प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.                   
       पंढरपुर येथे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सत्वशिला चव्हाण, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. भारत भालके, आ. दीपक साळूंखे, आ. रामहरी रुपनवर, जिल्हा परीषद अध्यक्षा डॉ.निशीगंधा माळी आदींची प्रमुख उपसिती होती.
       यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यावरणाच्या बदलामुळे विश्वाचे उष्णतामान वाढत आहे. यावर नियंत्रण घातले पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पेट्रोलमुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतू याबरोबरच झाडे लावणे, पाणी वाचविणे महत्वाचे आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी जलाशयामुळे मोठी समृध्दी आली आहे. परंतू उजनीची पाणी साठ्याची पातळी पाहता यापुढे पाणी जपून वापरले पाहिजे. पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाच्या समस्यावर मात करण्यासाठी गेल्या तीन वर्षात शासनातर्फे सुमारे 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणी देण्यात आले, जनावरांसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या छावण्या सुरु करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांची यावेळी सांगितले.
      पर्यावरण दिंडीचा हा कार्यक्रम पालखी मार्गावरुन प्रचार व प्रसार करीत येथे आला आहे. पर्यावरण दिंडीच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पर्यावरणाचे महत्व पोहंचविण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रशंसोदगार यावेळी काढले.
     याप्रसंगी विविध कलापथकांनी आपले पर्यावरणविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
 
Top