बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र राऊत व राजेंद्र मिरगणे या सर्वांनी केलेला प्रचार व कॉंग्रेसविरोधातील लाटेने धाराशिव मतदारसंघात जास्त मताधिक्य मिळाले. आगामी विधानसभेच्या सोलापूर जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास संपूर्ण जिल्हा कॉंग्रेसमुक्त दिसेल असे मत शिवसेना नेते विश्वनाथ नेरुरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
लातूर रोडवरील राजेंद्र राऊत यांच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पुरुषोत्तम बरडे, राजेंद्र राऊत, संभाजीराजे शिंदे, दिपक आंधळकर, भारतआबा शिंदे, बाबा कापसे, काका गायकवाड, रावसाहेब मनगिरे आदी उपस्थित होते.
२४ जून ते २३ जुलै असे महिनाभर सुरु असलेल्या माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सभेचा पहिला मान सोलापूर जिल्ह्याला मिळाला आहे. दि.२० रोजी बार्शीतील श्री.भगवंत मैदान व करमाळा येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जाहीर सभा आयोजित केली आहे.
राऊत यांच्या पुन्हा शिवसेनेतील प्रवेशाबाबत बोलतांना माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध असून फोनवर सतत संपर्कात होतो. कॉंग्रेसमध्ये त्यांची होत असलेली मुस्कटदाबी, उद्वेगाने बोलतांना व्यक्त होणारी खदखद मला नेहमी जाणवत होती. जिल्ह्याची सुत्रे आपल्या हाती आल्याबरोबर हक्काची माणसे जोडली.
आंधळकर यांच्या एकट्याच्या खांद्यावर बार्शी तालुक्याच्या शिवसेना पक्षाची पताका होती. शिवसेना वाढविण्यासाठी त्यांच्यापरीने त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आंधळकर हे तापट व मनाने क्लिअर असलेले आहेत काही वेळा ते पटकन रिऍक्ट करतात. तर शिवसेनेत काहीजण व्यावसायिक आहेत त्यांना इकडचे तिकडे, तिकडचे इकडे असे होत आहे तिकीट कोणाला द्यायचे अथवा जाहीर करण्याचे अधिकार मला नाहीत. सोलापूर जिल्ह्याचे चित्र बदलले, विविध वर्तमानपत्रांतून ते प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल व बार्शीची बुरशी नष्ट होईल असेही नेरुरकर यांनी म्हटले.