बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: अडीच वर्षे राखीव अन अडीच वर्षे खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्षपदाच्या निर्णयानुसार बार्शीत राखीव जागेवरुन कादर तांबोळी यांनी अडीच वर्षे नगराध्यक्षपदाची सुत्रे सांभाळली. अडीच वर्षांचा कालावधी झाल्यावर नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली. अर्ज भरण्याच्या मुदतीत राष्ट्रवादीचे नगरसेवक रमेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
रमेश पाटील यांच्या अर्जावर सुनिल वायचळ, ज्यातिर्लिंग कसबे, संदिप बारंगुळे, बागवान या नगरसेवकांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे. माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी दत्तात्रय लांघी यांच्याकडे अर्ज देण्यात आला आहे.
नगराध्‍यक्षपदासाठी खुल्‍या गटातून मंगलताई शेळवणे, बाबुराव जाधव, नाना मांगडे यांची नावे चर्चेत होती. परंतु एकमेव अर्ज दाखल झाला आहे. उपनगराध्‍यक्ष पदासाठी अजूनही रस्‍सीखेच सुरु असल्‍याने या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा जोरात सुरु आहे.
 
Top