उस्मानाबाद :- जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातील उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी यांना गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार उत्कृष्ट काम केल्याबदृदल त्याचा गुणगौरव राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला.
यावेळी कृतज्ञता सोहळयाप्रसंगी बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यास त्यांच्या कामात नक्कीच प्रगती होत असल्याचे त्यांनी गौरवोदगार काढले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपायक्ष संजय पाटील दुधगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, सभापती पंडित जोकार, सभापती धावारे, सभापती श्रीमती कोरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एल मुकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. व्हट्टे, संजय पाटील दुधगावकर, सुमन रावत आदिंनी आपले मनोगत व्यक्त करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबदृल त्यांचे अभिनंदन केले.
पालकमंत्री चव्हाण बोलताना म्हणाले की, प्रत्येक कामाला चालना देण्यासाठी त्यांनी केलेल्या कामास प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण ही तसेच आहे. पशुवैदयकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पशुंच्या आजारावर उपचार व निदान करण्यासाठी त्यांना रात्री-बेरात्री रानावणात, शेतातील चिखलातून पाई जाऊन तेथील मुक्या जनावरावर उपचार करुन त्यांचे प्राण वाचवावे लागतात असेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते डॉक्टर मंडळीचा सपत्नीक स्मृती चिंन्ह, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात पशुवैदयकिय दवाखाने, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थाने बांधण्यात आली आहे. पशुपालकांना पशुखादय, बियाणे, खत वाटप करण्यात आली आहेत. शेतकरी व पशुपालकांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाळ जनावरांचे वाटप, शेळी, मेंढी, कुक्कुट वाटप करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून आर्थीक सुबता त्यांना प्राप्त झाली असल्याचे त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
याप्रंसगी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सभापती, सदस्य जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकिय अधिकारी व कर्मचारी सहकुटुंब उपस्थित होते.
