बार्शी -: बँकेतून काढलेली ४ लाख ३५ हजारांची रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार महावीर चांदमल कुंकूलोळ (वय ४१) रा.बालाजी कॉलनी यांनी बार्शी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार बार्शी पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    यातील तक्रारदार कुंकूलोळ हे युनियन व उस्मानाबाद बँकेतून रक्कम काढून निज्ञाले असता दुचाकीला रक्कम असलेली पिशवी अडकवली होती यावेळी मोबाईलवर फोन आल्याने बोलत असतांना अज्ञात चोरट्याने रक्कम चोरल्याचे तक्रारदाराचे मत आहे.
 
Top