बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: लाड सुवर्णकार मंडळी,बार्शी या विश्वस्त संस्थेचा अंतर्गत वाद सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात न्यायप्रविष्ठ झाला आहे. यातील अर्जदार अजय वसंतराव ढाळे यांनी सादर केलेल्या आठ फेरफारासाठी ठोस पुरावे दिले नसल्याने न्यायालयाने प्रकरण निकाली काढण्याचे मत नोंदविले. यानंतर अर्जदाराच्या वकिलांनी शेवटची संधी मागीतल्याने २२ जुलै रोजी निकाल लागण्याची व या प्रकरणातील अर्जदार ढाळे यांना मोठा दंड देखिल करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती यातील प्रतिवादी भगीरथ वसंतराव बेद्रे यांनी दिली.
धर्मदाय आयुक्तांकडे असलेल्या प्रकरणातील प्रतिवादी भगीरथ बेद्रे यांनी सदरचा अर्ज हा केवळ टाळाटाळ करणे, प्रकरण लांबणीवर टाकणे या उद्देशाने दिला आहे. अर्जदाराने यातील स्टेप घेण्यासाठी कधीही प्रामाणिक प्रयत्न केला नाही. सन २०११ पासून वेळकाढूपणा केला आहे. अर्जदार प्रत्यक्ष हजर राहत नाही. या प्रकरणात अर्जदारास वारंवार संधी देण्यात आली परंतु अद्यापही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही व पाठपुरावाही करण्यात आला नसल्याने तक्रारी अर्ज व बदल अहवाल नामंजूर करावा अशी मागणी केली आहे. यातील भगीरथ बेद्रे यांना, त्यांच्या मुलांना व कुटूंबास समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी तसेच मारहाण झाल्याच्या तक्रारी यापूर्वीच बार्शी पोलिसांत दाखल झाल्या असून सदरची प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. सुवर्णकार समाजातील अत्यंत चर्चील्या जाणार्या या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.