उस्मानाबाद :- वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटाका कारखान्याच्या दुर्घटना झालेल्या ठिकाणी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कळंबचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, वाशीचे तहसीलदार रामहरी गोरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
सकाळीच डॉ. नारनवरे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अधिकारी व स्थानिकांकडून घटनेबाबतची माहिती जाणून घेतली. यासंदर्भात, आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
काल घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली होती. अग्निशमन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभागाच्या यंत्रणांशी बोलून त्यांनी मदत कार्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले होते. त्यानुसार कालच बारवकर, गोरे यांच्यासह पोलीस व इतर यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. पाऊस सुरु असतानाही स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मदतकार्य सुरु ठेवण्यात आले. आज पुन्हा सकाळी डॉ. नारनवरे यांनी स्वता घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.