उस्मानाबाद -: विकास कामाची गंगा गोर-गरीब जनतेच्या दारात पोहचविण्यासाठी लोप्रतिनिधी आणि पदाधिका-यांची अविश्रांत पराकाष्ठा घेण्याची आवश्यकता असून शासकीय योजनेपासून कोणीही वंचित राहू नये, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. ते तुळजापूर तालुक्यातील वडगाव (लाख) ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषि सभापती पंडित जोकार, तुळजापूर पं. स. उपसभापती प्रकाश चव्हाण, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष बाबा वडणे, जि.प.चे सदस्य धीरज पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, दगडोबा करंडे, सपकाळ, नायब तहसिलदार जी.यु. वाघे, प्र. गटविकास अधिकारी, चकोर आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, शेतकरी व जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येते. त्या योजनेचा लाभ गरजू, गोर-गरीबांना झाला पाहिजे. तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी 1500 विहीरी मंजूर केल्या. तलाव व साठवण तलावाची कामे घेतल्याने सदया या भागातील जनतेला पाण्याची टंचाई जाणवत नाही. सिंचनाच्या सोईमुळे या भागातील शेतक-यांचे जीवनमान उंचावले आहे. आपत्तीत सापडलेल्या शेतक-यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करुन शासनाच्या विविध योजना जनतेच्या दारी पोहाचविण्यात आल्या आहेत. त्याचा चांगला फायदाही शेतकऱ्याला व जनतेला झालेला असल्याचे सांगितले.
पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील मौ. काक्रंबा, वडगाव लाख, खंडाळा आणि मौ. कार्ला या गावास भेटी देवून तेथील जनतेच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. शासन शेतकऱ्यांच्या व जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून गरजूंना अनुदान मंजुर करण्यात येतील .दलित वस्ती, झोपडटी विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. चव्हाण यांच्या हस्ते संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभाथ्यांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले. वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांच्या विविध अडचणीचे त्वरीत निराकरण करावे. संबंधित यंत्रणेनी गावातील पाणीपुरवठा योजना, इंदिरा आवास योजना, विहीरींची कामे, राजीव गांधी जीवनदायी योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना गावात राबवून विकास साधण्याचे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, गरीबांना बसण्यासाठी, धार्मिक कार्यक्रम घेता यावे, यासाठी समाज मंदिर, सभागृह बांधण्यात येतील. बेरोजगाराना रोजगार मिळवून देण्यात येतील. त्यांनी जनतेशी संवाद साधुन ग्रामीण भागातील अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करुन जनतेच्या विकास कामांना प्राधान्य द्यावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणेला त्यांनी दिले.यावेळी लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.