नळदुर्ग :- शासनाने नगरपालिकेच्‍या विद्यमान नगराध्‍यक्ष यांना दिलेली मुदतवाढ रद्द केल्‍याने नळदुर्ग नगराध्‍यक्ष पदाची निवडणुक होणार आहे. नगराध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत कॉंग्रेसच्‍या नगरसेविका सौ. मंगल सुरवसे यांची नगराध्‍यक्षपदी निवड होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
    नळदुर्ग येथील नगरपालिकेवर कॉंग्रेस पक्षाची सत्‍ता असून न.प. मध्‍ये सतरा जागा पैकी कॉंग्रेस पक्षाचे नऊ सदस्‍य, राष्‍ट्रवादीचे सहा तर एक शिवसेना अशी पक्षीय संख्‍या आहे. एका राष्‍ट्रवादी सदस्‍यांचे नुकतेच निधन झाल्‍याने ती जागा रिक्‍त आहे. पुढील अडीच वर्षाचा कालावधीकरीता नगराध्‍यक्ष पद हे ओबीसी (इतर मागासवर्गीय) स्‍त्रीसाठी राखील ठेवले आहे. प्रभांग तीनमधून निवडून आलेल्‍या मंगल उध्‍दव सुरवसे या सलग तीन वेळेस निवडून आल्‍या आहेत. त्‍यांचा सामाजिक व राजकीय कार्य उल्‍लेखनीय आहे. महिला मंडळ, महिला बचत गटाच्‍या माध्‍यमातून अनेक महिलांना त्‍यांनी स्‍वावलंबी बनवले आहे. तर नगरसेवक म्‍हणून कार्य करताना प्रभागातील नागरिकांच्‍या समस्‍या त्‍यांनी सोडवल्‍या आहेत. पाणीपुरवठा व स्‍वच्‍छतेकडे त्‍यांची सतत लक्ष असते, याबाबत न.प. सभागृहात त्‍यांनी प्रश्‍न उपस्थित करुन सोडवले आहेत.
    नगराध्‍यक्षपदाच्‍या निवडीकरीता जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी सुरवसे यांचेच नाव निश्चित करावे, अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांतुन होत आहे. विद्यमान नगराध्‍यक्षपदी शहबाज काझी हे आहेत. तर उपनगराध्‍यक्षपदी अपर्णा बेडगे हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुक पाहता सर्वसमावेशक, सर्वांना बरोबर घेऊन कार्य करणारी व्‍यक्‍ती नगराध्‍यक्ष व्‍हावी, असे शहरवासियांचे मत आहे.
 
Top