उस्मानाबाद :- जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या क्षेत्रात मंगळवार दि. 15 जुलै रोजी वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत सर्व नगरपालिका क्षेत्रात वृक्षलागवड करण्याची मोहिम सुरु करण्यात आली असून हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या आहेत.
    वृक्षलागवड मोहिमेसंदर्भात डॉ. नारनवरे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, नागरी विकास प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प संचालक कुरवलकर यांनी यासंदर्भात सर्व मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या असून सर्व नगरपरिषदेचे पदाधिकारी, सदस्य, नगरपालिका क्षेत्रातील नागरिक यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.         
 
Top