बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कुर्डूवाडी-लातूर रस्त्याच्या बार्शी बाह्यवळण रस्त्यावर एक दुचाकी जळालेल्या अवस्थेत पडून असल्याचे दिसून येत आहे. सदरच्या वाहनाची अवस्था ही अत्यंक दयनीय करण्यात आली असून सदरची घटना कोणाच्या वैमनस्यातून झाली अथवा मनोविकृतीन घडली याबाबत प्रत्यक्षदर्शी कोणीही दिसून येत नाही.
    सदरचे वाहन कोणत्या गुन्ह्यात वापरले होते काय ? बचह्यवळण रस्त्यावर कोणाता मोठा गुन्हा घडला काय असा प्रश्‍न अनेकांच्या मनात निर्माण झाला असला तरी बार्शी पोलिसांना मात्र याबाबत कसलीच कल्पना नसल्याचे दिसून आले. मागील दोन तीन दिवसांपूर्वी बार्शीतील मुस्लिम तरुणांनी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दिवसाढवळ्या दहन केले परंतु याबाबत बार्शी पोलिसांत कसलीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. सदरच्या पुतळा दहनाचे छायाचित्र अनेकांनी आपल्या खाजगी फेसबुक या सोशल मिडीयावर अपलोडही केले, काही जणांकडे याच्या व्हिडीओ क्लिपदेखिल उपलब्ध झाल्या सोशल मिडीयावर याचा भरपूर वापर झाला असला तरी बार्शी पोलिसांना मात्र याबाबत कसलीही पुसटशीही कल्पना नसल्याचे चौकशीतून दिसून आले. सदरच्या घटनेची चौकशी करण्याचेही त्यांच्या मनात आले नाही याचे नेमके कारण काय याबाबतही अनेकांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहे. बार्शी पोलिसांच्या कडून सर्वसामान्यांच्या असलेल्या कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अपेक्षा मात्र फोल ठरतांना दिसून येत आहेत. मागील दोन तीन महिन्यांत बार्शी तालुक्यातील तीन खुनाचे प्रकार हे सर्व काही सागून जातात. बार्शीमध्ये नियमित सुरु असलेल्या बेकायदा धंद्यावरही पोलिसांचा अंकुश नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. एकूणच बार्शी पोलिसांचा कारभार नागरिकांच्या मनात शंका उत्पन्न करणारा व विश्वास कमी झाल्याचा दिसून आला आहे. यावर वरिष्ठ अधिकार्‍यांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

 
Top