उस्मानाबाद :- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत येत्या 25 जुलै रोजी सकाळी 10 ते सायं 4 वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र मोहा, (ता.कळंब) येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ पात्र रुग्‍णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    या शिबीरात स्त्रीरोग, बालरोग, शल्य चिकिकत्सा, भिषकतंत्र सहभागी होवनू रुग्णाची मोफत तपासणी करतील. आवश्यकता भासल्यास रुग्णाना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया किंवा उपचारासाठी संदर्भित केले जाणार आहे.
    पिवळे,केशरी,अत्योंदय व अन्नपूर्व शिधापत्रिकाधारक या  परिसरातील रुग्णानी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोहा यांनी केले आहे.                                         
 
Top