उस्मानाबाद :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,तुळजापूर रोड, उस्मानाबाद येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका ऑनलाईन www.dvetadmission.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अभ्यासक्रमासाठी प्रवेश 22 जुलैपर्यंत करावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बी.एस. गायकवाड यांनी केले आहे.
इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कोपा, डिटीपीओ, सेक्रेट्रीयल प्रॅक्टीस, ड्रेसमेकींग, बेसिक कॉस्मेटॉलॅाजी, फळे व भाज्या संस्करणाचे प्रशिक्षण आहे. तसेच दोन वर्षाचे वीजतंत्री, मोटार यांत्रिक गाडी, एम आर ए सी, टर्नर, मेकॅ. इलेक्ट्रॉनिक्स, मशिनिष्ठ, फिटर,
तसेच अल्पसंख्याकासाठी ड्रेसमेकींग, बेसिक कॉस्मेटॉलॉजी. मेकॅ. इलिक्ट्रॉनिक्स आणि फळे व भाज्या संस्करण या अभ्यासक्रमासाठी व इयत्ता 8 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचे अभ्यासक्रम सुतारकाम, संधाता, बिल्डिंग कंन्स्ट्रक्शन्स व दोन वर्षासाठी तारतंत्री, पेंटर जनरल अभ्यासक्रमाकरीता आणि अल्पसंख्याकासाठी मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी अर्जासाठीचे शुल्क मागासवर्गीयाकरीता रुपये 40/- व सर्वसाधारण उमेदवारासाठी रुपये 50/- आहे. तसेच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया या संस्थेत उपलब्ध आहे. तथापी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज बाहेरुन भरल्यास ऑनलाईनची प्रिंट काढून या संस्थेत नेांदणी करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.