गुजनूर शाखेच्‍या अध्‍यक्षपदी बंडू मुलगे, उपाध्‍यक्ष कांचन वाघमारे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्‍हाध्‍यख प्रशांत नवगिरे यांनी म्‍हणाले की, आज जिल्‍ह्यात व तालुक्‍यात  विरोधी पक्षाची भुमिका फक्‍त महाराष्‍ट्र नवनिर्माण  सेना बजावित असून सर्व सामान्‍यांच्‍या प्रश्‍नांसाठी रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करणारा व न्‍याय मिळवून देणारा पक्ष म्‍हणून मनसे कार्यरत आहे. तालुक्‍यातील सत्‍ताधा-यांनी फक्‍त बगलबच्‍चे मोठे करण्‍याचे काम केले आहे. आगामी विधानसभा निवडनूकीत सत्‍ताधा-यांना पायउतार करण्‍यासाठी जनतेने मनसेच्‍या पाठीशी खंबीर उभे राहावे असे आवाहन केले. यावेळी अमरराजे परमेश्‍वर, एस.के जागिरदार, शाम माळी, ज्‍योतिबा येडगे, बशीर शेख, यांनीही आपल्‍या भाषणात सत्‍ताधा-यांना धडा शिकविण्‍याचे आवाहन केले.
    या कार्यक्रमास नळदुर्ग, वागदरी, शहापूर दहिटना, जळकोट, व परिसरातील मनसे व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तुळजापूर शहराध्‍यक्ष राजेश मलबा,शहराध्‍यक्ष , उपशहराध्‍यक्ष अलिम शेख, अरूण जाधव, रमेश घोडके, नळदुर्ग शहराध्‍यक्ष शिरीष  डुकरे यांच्‍यासह असंख्‍य कार्यकर्ते उपस्थित होते.

           युवकांनी मनसेत शामील व्‍हावे - एस.के जागिरदार
(नळदुर्ग ) 
पाटील तांडा ता. तुळजापूर येथे मनसेतर्फे युवक मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. हा कार्यक्रम आयोजीत करण्‍यासाठी पाटील तांड्यातील  युवकांनी पुढाकार घेतला
 या कार्यक्रमासाठी मनसे जिल्‍हाध्‍यक्ष प्रशांत नवगिरे, युवा नेते एस.के. जागिरदार, जिल्‍हासचिव अमरराजे परमेश्‍वर हे उपस्थित होते.
  यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एस.के जागिरदार यांनी सांगितले की, पाटील तांड्यातील युवकांचा पाठीशी मनसे खंबीरपणे उभी राहील व  त्‍यांच्‍या सर्वांगिण  वि‍कासासाठी आम्‍ही सतत प्रयत्‍नशील राहू. यापूढे येथील सर्व युवकांनी मनसेत सामील व्‍हावे असे आवाहन केले. जिल्‍हाध्‍यक्ष प्रशांत नवगिरे व जिल्‍हासचिव अमरराजे परमेश्‍वर यांनीही यापढे पाटील तांड्यातील लोकांनी कोण्‍याही सत्‍ताधा-यांना न घाबरता  मनसेच्‍या पाठीशी राहावे. येथील लोकांच्‍या अडी अडचणी व प्रश्‍नांसाठी रस्‍त्‍यावर उतरून न्‍याय मिळवून देण्‍यासाठी सदैव प्रयत्‍नशील राहू असे आश्‍वासन केले  या कार्यक्रमास पाटील तांड्यातील युवक , नागरिक मोठया संख्‍येनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी सचिन पवार, राहूल पवार, शंकर राठोड, संजय राठोड, बाबू पवार आकाश आडे, विजू राठोड, अविनाश चव्‍हाण,  पत्रकार सतिष राठोड आदीनी परिश्रम घेतले.
 
Top