बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एस.टी) समावेश करण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. बार्शीतील पोस्ट ऑफिस चौकात गुरुवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
    यावेळी निवासी नायब तहसिलदार एन.बी.गायकवाड, पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बजरंग नरोटे, आप्पासाहेब शेंडगे, राहुल शेंडगे, हरिभाऊ कोळेकर, आदींनी मनोगते व्यक्त केली.
    यावेळी बाळासाहेब पाटील, खंडू नरोटे, राहुल शेंडगे, बन्नी होनमाने, शितल पाटील, पद्माकर चोरमुले, गुणवंत खांडेकर, विश्वास शेंडगे, हंबीर नरोटे, बसू कुंटोजी, अरुण येळे, अक्षय खरात, सचिन शेंडगे, मिलींन वाघमोडे, विजय शिगाडे, सचिन वायकुळे, जयंत गावडे, दशरथ काळे, दिपक खरात आदी उपस्थित होते.
 
Top