उस्मानाबाद - सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने राष्ट्रीय हरित अभियान मोहिम राबविण्यात आली. या अभियानाचा समारोप  पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोप  करुन  करण्यात आला.
    याप्रंसगी माजी  खा. डॉ. पदमसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी  जे. टी. पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख अभिषेक  त्रिमुखे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक मायकलवार, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडुकर, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
      राष्ट्रीय हरित अभियांनातर्गत जिल्हयातील नागरीकांना सवलतीच्या दराने विविध प्रजातीची रोपे, औषधी वनस्पती, फळझाडे, शोभीवंत रोपे माफक दराने विक्री करण्यात आली. या हरित अभियान मोहिमेस नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
                                                       
 
Top