पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) ग्रामपंचायतीने 15 ऑगस्ट निमित आयोजित केलेली विशेष ग्रामसभा अभूतपूर्व वातावरणात पार पडली. महिलासह युवक युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. ग्रामसभेत अनेक ठराव समत करण्यात आले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामा लाडे हे होते. ग्रामपंचायतेच्या इतिहासात प्रथमच युवा वर्ग मोठ्या संखेने हजर होता. यावेळी बार्शी पंचायत समितीच्या सभापती सौ. कौसल्या माळी, तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख, ग्रामविकास अधिकारी वैभव मालकर, पांगरीचे उपसरपंच भारत वाकडे, माजी सरपंच विजय गोडसे, जयंत पाटील, सतीश जाधव, आकिल बागवान, बापू बगाडे, सतीस डीसले, हनुमंत गाढवे, नाना देशमुख, शीतल जनराव, रूपाली नारकर, सुनील गाडवे, धनंजय तौर याच्यासह गावातील शेकडो महिला व पुरुश ग्रामसभेला हजर होते.
पांगरीच्या विकासाच्या दृष्टिने उपस्थितांनी अनेक ठराव मांडले. पांगरी गावासाठी बाग तयार करणे, गावातून वाहणार्या नदीचे सुशोभिकरण करणे, पांगरीसह परिसरात वृक्षारोपन करणे, स्मशान भूमी शेड दुरूस्ती करणे, गावातील भारनियमन कमी करावे, गावातील मुलांच्या दर्जा वाढीबाबत पावले उचलणे, विद्यमान तंटामुक्ती समितीला मुदतवाढ देणे, पांगरी तंटामुक्त समितिच्या परस्पर पोलिसांनी गुन्हे दाखल करू नये, गावातील गटारीची सफाई करणे, सार्वजनिक स्मशान भूमितील मुरूम ऊचलनारेवर निर्बंध घालणे आदि ठराव यावेळी मंजूर करण्यात आले. यावेळी जलसंधारणाची वैयक्तिक आदि विषयावर चर्चा करण्यात आली. पांगरी गावातील तरुणाई जागृत झाल्याचे या प्रसंगी निदेर्शनास आले.