पांगरी (गणेश गोडसे) :- ममदापूर (ता. बार्शी) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध ठराव समत करण्यात आले. विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जीवन गायकवाड होते. भविष्यात गावास जागेची गरज भासल्यास इतर कोणताही पर्याय शिल्लक नसल्यामुळे व गावास पाझर तलावाचा धोका आहे. भविष्यात गावाच्या पुनर्वसन साठी गावास जागेची गरज आहे.त्यामुळे सरकारी गायराण जागा ही मूळ मालकी ठेऊन ही जमीन ज्यांच्या नावे आहे त्‍यांच्याच नावे ठेवावी असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
    ममदापूर येथील ग्रामस्थानी सरकारी गायरान जागेबाबात चर्चा करून ठराव करण्‍याची मागणी लेखी अर्जाद्वारे केली होती. ग्रामपंचायत सचिवांनी गट क्रमांक 177 ही जमीन ग्रामपंचायत ममदापूर यांचे नावे आहे. गट क्रमांक 311 ही जमीन गट विकास अधिकारी बार्शी यांच्या नावे आहे. गट क्रमांक 108-116-128 ह्या जमिनी सरकार यांच्या नावे आहे.  सदर जमिनी सध्या जे लोक वहिवाट करत आहेत त्यंचीच वहिवाट ठेवावी व त्या गटाची मालकी पूर्वीप्रमाणेच ठेवावी असे ठरवण्‍यात आले. यावेळी उपसरपंच सत्यभामा गरड, अंकुश घोडके दशरथ पाटील, दत्ता निंबाळकर, बालाजी खलदकर, राजेंद्र जगताप, बालाजी मोरे सुरेश घावटे, चंद्रकांत मुळे राजेंद्र गायकवाड, विलास खळद्कर, लाला खुने आबा खुने, सुग्रीव गायकवाड ग्रामसेवक राहुल गरड यांच्यासह ग्रामस्‍थ हजर होते.
 
Top