पांगरी (गणेश गोडसे) :- पांढरी ता. बार्शी येथील रोपवाटीकेवरील मजुरांचा अनेक महिन्यांचा पगार थकल्यामुळे मजुरावर उपासमारीची वेळ आली असून थकीत पगार तत्काळ वाटप करावा अशी मागणी पांढरी येथील महिला मजुरांनी एका लेखी निवेदनाद्वारे तहसीदारकडे केली आहे.
मजुरांनी तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, पांढरी येथील वन खात्याच्या रोपवाटीकेवर गावातील अनेक गरीब महिला मजुरी करतात. रोपवाटीकेचे काम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करण्यात येते. जवळपास 26 मस्टरचे काम पूर्ण झाले आहे.त्यापेकी काही मस्टरचा पगार संबंधित महिला मजुरांच्या खात्यावर जमाही झाला आहे.मात्र गत अनेक महिन्यापासून असंख्य महिला मजुरांचा पगार शासनाने अदा केलेला नाही.त्यामुळे गावातील गरीब मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे.वारवार शासनाकडे अर्जे विनंत्या करूनही शाशन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे मजुराची कौटुंबिक स्थिति बिकट झाली आहे.तरी शासनाच्या संबदित विभागाणे याकडे लक्षं केंद्रीत करून मजूराचे पगार करावेत अशी मागणी आहे.