भारतीयांनो...
ना मी कुण्या धर्माचा,
ना मी कुण्या जातीचा,
मी तर आहे फक्त
भारताच्या मातीचा...
जाता जाता कुणी जात घेऊन जात नाही,
जाता जाता कुणी धर्म घेऊन जात नाही,
जाता जाता मुठभर माती घेऊन जावी लागते,
अशी ही महान माती कुणाला
त्याची जात विचारत नाही,
अशी ही दिलदार माती कुणाला
त्याचा धर्म विचारत नाही || 1 ||
आणि म्हणूनच सांगतो..... भारतीयांनो
ना मी कुण्या धर्माचा,
ना मी कुण्या जातीचा,
मी तर आहे फक्त
भारताच्या मातीचा...
जाता जाता कुणी तन घेऊन जात नाही,
जाता जाता कुणी धन घेऊन जात नाही,
जाता जाता या मातीतले आपले कर्म घेऊन जावे लागते,
अशी ही कर्तृत्वान माती कुणाला
त्याचा धर्म विचारत नाही...
अशी ही मौलवान माती
कुणाला जात विचारत नाही || 2 ||
आणि म्हणून सांगतो... भारतीयांनो
ना मी कुण्या धर्माचा,
ना मी कुण्या जातीचा,
मी तर आहे फक्त
भारताच्या मातीचा...
जय हिंद जय भारत....
- संतोष पांचाळ
मु.पो. मुरुम,
ता. उमरगा, जि. उस्मानाबाद