पांगरी (गणेश गोडसे)  धोत्रे ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीचे  माजी सरपंच व कर्ज बाजारी शेतकरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान धोत्रे शिवारात घडली.दत्तात्रय महादेव लांडे वय 50 असे कर्जास कंटाळून आत्महत्या केलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे.
बाळासाहेब बब्रुवान लांडे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की मयत दत्तात्रय लांडे हे आज दि.25 सोमवारी सकाळी सहा वाजता प्रात विधीसाठी म्हणून घरातून बाहेर पडले व जवळच्याच मारुती दगडू लांडे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडास बैल बांधण्याच्या कासर्‍याने स्वत; गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली.पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.अधिक तपास हवालदार बिराजदार करत आहेत.
 
Top