पांगरी (गणेश गोडसे)  बार्शीकडे निघालेल्या गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात निवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी भूम-बार्शी मार्गावर भोयरे ता.बार्शी गावाजवळील वाळणावर घडली.
   भरत किसन आगळे वय 59 रा.आगळगाव ता.बार्शी असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून अंजली भरत आगळे वय 45 असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्यावर बार्शीच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
    मयताचा मुलगा उमेश भरत आगळे र.आगळगाव वय 19 यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की काल दुपारी आगळगाव येथील काम आटोपून ते व त्यांचे वडील मयत भरत आगळे आई अंजली आगळे व गाडी चालक अजित उत्रेस्वर गोटे वय 26 रा.बार्शी  हे त्यांच्या मारुति सुजुकी क्रमांक एम.एच.13 ए.झड .1039 मधून बार्शीकडे जात असताना भोयरे शिवारात गाडी आली असता गाडीचा टायर फुटून गाडीने तीन पालट्या मारल्या॰त्यात भरत आगळे हे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी बार्शीच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृतू झाला.भरत आगळे हे नुकतेच पांगरी येथील जी.प.शाळेतून मुख्यध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.बोलक्या व मनमिळावू स्वभावाच्या आगळे यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर आगळगाव येथे अंतविधी करण्यात आला॰पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत.
 
Top