सोलापूर - जाई - जुई विचार मंच व NIIT यांच्‍या वतीने आयोजीत करण्‍यात आलेल्‍या जॉब - फेअर 2014 ला युवक युवतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
     शनिवार व रविवार या दोन्‍ही नॉथकोट मैदानावर आयोजीत या रोजगार मेळाव्‍यामध्‍ये चा हजार उमेदवारांनी रजिस्‍टेशन करून सहभाग नोंदविला व या जॉब फेअर मध्‍ये एकूण सातशे एकेविस उमेदवार यांचे शॉटेलिस्‍ट व सलेक्‍सन करून त्‍यांना नोकरीची संधी मिळवून दिली. एकुण सुमारे दहा हजार उमेदवारांनी मुलाखत दिली. सोलापूर शहरातील युवक युवतींचा जॉब फेअरच्‍या वतीने रोजगाराच्‍या नवीन संधी आमदार प्रणिती शिंदे यांनी निर्माण करून युवकांच्‍या विकासाकरिता महत्‍वपूर्ण योगदान दिले आहे असे गौरवोदगार अनेक क्षेत्रातील मान्‍यवरांची जॉब फेअर भेट देवून मनोगत व्‍यक्‍त केले.
  या जॉब फेअरमध्‍ये इंफोसिस बी.पी.ओ I.L & F, मुंबई एल.आय.सी सोलापूर अविनाश भोसले इंफ्रास्‍टक्‍चर लि. शॉपर्सग् टॉप नट्स सोलापूर MEP इंफ्रास्‍टक्‍चर डेव्‍हलपर्स लि. प्रिसीजन कॅमशॉफ्ट सोलापूर रूद्राली हायटेक सोलापूर, लक्ष्‍मी हायड्रॉलिक्‍स,जिल्‍हा यंत्रमाग धारक संघ, क्रॉस इंटरनॅशनल, बालाजी अमाईन्‍स यांच्‍यासह अनेक कंपन्‍यांनी सहभाग घेतला होता.
 जॉब फेअरच्‍या समारोप प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांच्‍या हस्‍ते सर्व सहभागी कंपन्‍यांना सन्‍मान चिन्‍ह देवुन गौरविण्‍यात आले, तर  निवड झालेल्‍या सर्व उमेदवारचे अभिनंदन करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी संदीप देसाई, दिप्‍ती देसाई, श्‍वेता उपरे ,आतीष पारसे, अमृता हंचाटे, ताहेरा शेख ,योगेश जोशी , अमोल कटारे, यांच्‍यासह कार्यकर्त्‍यानी परिश्रम घेतले.   
 
Top