बार्शी - येथील छायाचित्रकार संघटनेच्या वतीने दि.१९ रोजी छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुभाषनगर येथील कुंकूलोळ शिशुविकास केंद्रात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी २७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. दिवंगत छायाचित्रकारांना आदरांजली वाहून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. छायाचित्रकार संघटनेची नूतन कार्यकारीणी अशी : अंकुश कंगले (अध्यक्ष), विनोद गुंड (उपाध्यक्ष), विकी नवले (सचिव), पवन सातपुते (सहसचिव), सुनिल यादव (खजिनदार), कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोमनाथ सेवकर, सचिन रुद्रवार, राजू पराते, बंटी काळे, ओंकार चंद्रशेखर, सिध्देश्वर जाधव, सतिश नेटके, सोमनाथ सगरे, सोमनाथ शिवशेट्टी, सुस्मित बागल, सागर खुडे यासह अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
Top