उस्मानाबाद  - राजकारणात कळीचा मुद्दा ठरत असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना यावर्षी पुन्हा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. तेरणा कारखान्यातील गैरकारभाराची चौकशी करावी या मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. २७ ऑगस्‍ट रोजी मार्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चास तेरणाच्या सभासदांनी उपस्थित रहावे असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच कळीचा ठरत असलेला तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावर आलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. परवा राणा पाटलांनी कारखान्यांची पहाणी केल्यानंतर कामगारांनी कारखान्यातील गैरव्यवहार व सध्याच्या कारभा-या विरोधात ग-हाने कामगारांनी राणा पाटालांच्या पुढे गायले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने आता तेरणा कारखान्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेरणा कारखान्याच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी व गैरकारभाराची नि:पक्ष चौकशी होण्यासाठी शासनाने तातडीने प्रशासक नेमावा, तालुका दंडाधिकारी यांनी कारखान्याच्या रेकॉर्ड जप्तीचे वॉरंट काढले होते.
हे वॉरंट काढुन सव्वा वर्षाच्या काववधी लोटला तरीही या वॉरंटची अंमलबजावनी करण्यात आलेले नाही, तेरणा कारखान्यातील २००७ ते २०१४ पर्यंतचे बिगर सभासद शेतक-याचे ऊसाचे बिल त्वरीत अदा करावे, तसेच विद्यमान संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये किती भंगार विकले याचा तपासील देण्यात यावा व इतर मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मार्चास शेतकरी व सभासदांनी मोठ्या संख्येन उपस्थित रहावे असे अवाहन करण्यात आले आहे.
मनसेच्या तालुकाध्यक्षपदी प्रदीप सूर्यवंशी
उस्मानाबाद : मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने विधी मंडळ गट नेते बाळा नांदगांवकर व सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनानुसार मनसे तालुका अध्यक्षपदी प्रदीप सुर्यवंशी यांची तर शहर अध्यक्षपदी दादा कांबळे यांची निवड करुन त्यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष इंदजित देवकते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
 
Top