उस्मानाबाद - जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद आयोजित पुणे,सातारा,सोलापूर जिल्ह्यातील खाजगी क्षेत्रातील प्रतिथयश उद्योजक/कंपनी यांचेकडून जॉब ट्रेनी व सिक्युरिटी गार्ड या पदांची पदे भरण्यासाठी बुधवार, दि.27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनीटांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला उस्मानाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
         या मेळाव्यात रेहू पॉलीमर इंडस्ट्रीज,पुणे पदाचे नाव-जॉब ट्रेनी, उमेदवारांची पात्रता (आयटीआय कोणताही ट्रेड उत्तीर्ण),परी रोबोटिक्स लि,शिरवळ, जि.सातारा जॉब ट्रेनी, (आयटीआय फिटर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, सीएनसी, 12 एमसीव्हीसी पास),  इना बेअरिंग्ज, तळेगाव जि.पुणे जॉब ट्रेनी, ( एस.एस.सी किंवा एच.एस.सी किंवा आयटीआय कोणताही ट्रेड उत्तीर्ण), किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रिज, सोलापूर जॉब ट्रेनी, ( दहावी पास) वरील सर्वांसाठी वय वर्षे 18 ते 27 असे निर्धारित केले आहे. तर पियाजी व्हेईकल्स प्रा.लि.पदाचे नाव जॉब ट्रेनी, पात्रता- आयटीआय पेंटर, फिटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रीशयन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मशिनिष्ट, टर्नर, वेल्डर, सीओई (प्रॉडक्शन,मॅन्युफॅक्चर सेक्टर, ट्रेड उत्तीर्ण, वय वर्ष 18 ते 29 निधारित  तर जीफोर सीक्यर सोल्युशन(इं)प्रा.लि. विमान नगर, पुणे यांच्याकडून सिक्युरिटी गार्ड साठी दहावी पास असणे आवश्यक असून वय वर्षे 18 ते 33 असे निर्धारित करण्यात आले आहे.
          जिल्ह्यातील फक्त पुरुष उमेदवारांकरिता सहा उद्योजकाकडून 420 पदांकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड केली जाणार आहे. या मेळाव्यात सहभाग नोंदविण्याकरिता उमेदवारांना www.maharojagar.gov.in  या संकेतस्थळावर लॉगइन होऊन जॉब फेअर या ऑप्शनमधून आपणास ज्या उद्योजकाकडे मुलाखतीकरिता उपस्थित रहावयाचे आहे अशा उद्योजकांच्या नावापुढे ऑनलाईन अप्लाय नोंदवण्यात येऊन आपले प्रवेश पत्र ऑनलाईन प्राप्त करुन घ्यावे. याकरिता या कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे. सदर मेळाव्यास स्वखर्चाने हजर राहून खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या जास्तीत जास्त संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे. ( संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक 02472-222236 असा आहे.)      
                                                
 
Top