उस्मानाबाद - राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत लिपीक, कार्यालयीन सहायक, लेखापाल, परिचर, गट अभियंता, पंचायत अभियंता आदी कंत्राटी पदांची कौशल्य चाचणी घेऊन आणि आवश्यक पदांसाठी प्रात्यक्षिक कौशल्य आण  गट चर्चेद्वारे पात्र उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. ही भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे आणि राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच पार पाडल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी कळविले आहे.
            जिल्हा परिषदेत राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत भरती प्रक्रियेदरम्यान स्वता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून ही प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडली.
           शासनाचे ठरवून दिलेले निकष, मार्गदर्शक सूचना यानुसार भरती प्रक्रियेची जाहिरात देण्यात आली. त्यानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर करुन लेखी परीक्षेसंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आल्या. मात्र, पुन्हा शासनाकडून नवीन सूचना आणि नवीन वेळापत्रक निर्गमित करण्यात आले.  त्यानुसार लेखी परीक्षेऐवजी कौशल्य चाचणीचे आयोजन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. सदर सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करुन जिल्हा सूचना विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक व मार्गदर्शक सूचनांसह सुधारित जाहिरात देण्यात आली. मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रियेची पद्धत ठरवून देण्यात आली आणि संबंधित पदांसाठी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली, असे रावत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
           जिल्हा परिषदेने कौशल्य चाचणीसाठी  एका पदास 5 उमेदवार आणि प्रतिक्षायादीसाठी दुप्पट उमेदवार याप्रमाणे मूळ गुणवत्ता यादीनुसार दहा उमेदवारांना बोलावण्यात आले. जिल्हा परिषदेने प्राप्त अर्जांची छाननी करुन 27 ऑगस्टपर्यंत पात्र अर्जांची अंतरिम यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आणि 30 ऑगस्टपर्यंत आक्षेप मागविण्यात आले.  प्राप्त आक्षेपांवर सुनावणी घेऊन 2 सप्टेंबर रोजी पात्र अर्जांची आणि कौशल्य चाचणीकरिता यादी जाहीर करण्यात आली. शासनाने दि. 3 ते 5 सप्टेंबर या कालावधीत कौशल्य चाचणीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी दि.3 रोजी लिपीक व कार्यालयीन सहायकांकरिता टंकलेखन व संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक कौशल्य चाचणी तसेच गट चर्चा घेण्यात आली. यांत त्र उमेदवारांची त्यांच्या किमान अर्हतेच्या गुणानुक्रमानुसार निवड  करुन त्याच दिवशी अंतिम निवड यादी एनआयसी, जिल्हा प्रशासन संकेतस्थळ आणि जि.प.च्या सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात आली.
         दिनांक 4 रोजी लिपीक पदाच्या कौशल्य चाचणीत एकही पदाकरिता  उमेदवार पात्र ठरला नसल्यामुळे गुणवत्ता यादीतील पुढाल 10 उमेदवारांना दि. 6 व 7 सप्टेंबर रोजी कौशल्य चाचणीसाठी बोलावण्यात आले.  पात्रतेनुसार एका उमेदवाराची अंतिम निवड करण्यात आली.  परिचर,  गट अभियंता आणि पंचायत अभियंता या पदांकरिता कौशल्य चाचणी घेण्यात आली.  पंचायत अभियंता, लेखापाल पदांसाठीही हाच कार्यपद्धती वापरण्यात येऊन पारदर्शकपणे ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि सर्व संवर्गाचे एकूण 28 उमेदवारांची अंतीम निवड करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे
 
Top