बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर) : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौन्सीलच्या वतीने ९० व्या वर्धापन दिनानिमित्त विळा कनीस असलेल्या लाल झेंड्याचे सफाई कर्मचारी कॉम्रेड रमाबाई कुचेकर, साधना वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. बार्शीतील भगवंत मैदानावरील आयटक कामगार केंद्र कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. ङमिक एकजुटीचा विजय, पक्षाचा विजय, वर्धापन चिरायु आदी घोषणा देऊन पेढे वाटून आनंदोत्सव साजर करण्यात आला. सचिव कॉ.प्रविण मस्तुद यांनी मनोगत केले. यावेळी अनिरुध्द नकाते, भारत भोसले, अब्बास बागवान, केतन शेळके, राजू लालबेग, निर्मला सरवदे, शांता जाधव, चंद्रकांत देशमुख, किसन मुळे, शाहपरि शेख, विद्या कदम, अंजना वाघमारे, नंदा कांबळे, ताई लोकरे, सुवर्णा कांबळे आदी उपस्थित होते.

 
Top