बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) येथील वुशू मार्शल आर्टस संघटनेच्‍यावतीने शिवशक्‍ती मैदानातील इनडोअर स्‍टेडियम येथी मराठी चित्रपट कलाकार अमोल अर्जुन वाणी यांचा आ.पी.एल चित्रपटाच्‍या प्रमोशननिमित्‍त जाहीर शुभेच्‍छापर सत्‍कार करण्‍यात आला. 
   कराटे कलेच्‍या प्राविण्‍यातून चित्रपटसृष्‍टीत यंधी मिळवणा-या या नवोदित कलावंताचे कौतुक करण्‍यासाठी हा कार्य्रमम कराटे प्रशिक्षणार्थी मुलांना प्रेरणा म्‍हणून आयोजित करण्‍यात आला होता. याप्रसंगी वुशू संघटनेचे फुलचंद जावळे, प्रशिक्षक प्रदीप हागरे, क्रिडा शिक्षक विजयानंद निंबाळकर, संजय पटील, संपादक प्रा. लक्ष्‍मणराव मस्‍के आदि मान्‍यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अमोल वाणी यांनी मला ही संधी केवळ कराटे केल्‍यामुळे मिळाली असल्‍याचे मनोगत व्‍यक्‍त करून कराटे केलेला चांगले दिवस येत असल्‍याचे त्‍यांनी बोलून दाखलविले. 
  यावेळी संजय पाटील, विजयानंद निंबाळकर, लक्ष्‍मण मस्‍‍के यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन फलचंद जावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशिक्षक प्रदिप हागरे यांनी केले. 

 
Top