बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) :- बार्शीत मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटखा विक्री सुरु असल्याची माहिती मिळल्यानंतर सोलापूर येथील औषधे व अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकारी रेणुका रमेश पाटील यांनी केलेल्या कारवाईत टेंपोतून ५ पोती गुटख्याचे बेकायदा वितरण होत असल्याची बाब समोर आली आहे. शिवाजी आखाडा परिसरात केलेल्या कारवाईत वाहन चालक पोपट बाबा ठोंगे याला रंगेहाथ पकडून त्याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वजीर गुटखा नावाच्या पाच पोते मालाची अंदाजे १ लाख ४० हजार व गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिकअप वाहन क्रमांक एम.एच.१३ ए.एम. ४८४० किंमत २ लाख ५० हजार अशा एकूण ३ लाख ९० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. भा.दं.वि.१८८, २७३, ३२८ अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम २००६ चे कलम २६ (२) आय, ७२६ (२) ४ व नियमन ३, १, ७ (१) (ए) २,३,४ उल्लंघन शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल बोस हे करीत आहेत.
मुद्देमाल जप्त करुन केलेल्या कारवाईनंतर बार्शीत खुलेआम विक्री होत असलेल्या सर्व प्रकारच्या गुटख्याची विक्री तात्पुरती बंद करण्यात आली आहे. काही दिवसांतच पुन्हा नव्या उमेदीने व मोठ्या जोमाने अवैध व्यवसायांचे थैमान सुरु होईल असा प्रश्‍न अन्न सुरक्षा अधिकारी आर.आर.पाटील यांना विचारला असता आपल्याला देण्यात आलेल्या ५ तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात कारवाई करतांना येणार्‍या अडचणी, बंधने, पाहिजे तेवढे मनुष्यबळ मिळत नसल्याने अनेक अवैध व्यवसाय करणार्‍या आरोपींविरोधात गुन्हा नोंद होत नाही अथवा ते कायदेशीर बाबीत समोरही येत नसल्याची कबुली त्यांनयी दिली. शासनाने आणखी मोठ्या प्रमाणात अधिकारी, सहाय्यक व यंत्रणा वाढविल्यास यावर अंकुश येईल असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
फोटो औषधे व अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकारी रेणुका रमेश पाटील यांनी केलेल्या कारवाईत टेंपोतून ५ पोती गुटख्याचा मुद्देमाल हस्तगत केला
        यावेळी पोलिस निरीक्षक सालार चाऊस, तपास अधिकारी अतुल बोस व पोलिस कर्मचारी करत आहेत. 

 
Top