पांगरी  (गणेश गोडसे) :- राज्यातील शेतकर्‍यांना आडतमुक्त न केल्यास जिल्हाभर रास्ता रोको,चक्का जाम आदि आंदोलने करण्याचा इशारा राज्य युवा शेतकरी संघटनेच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आला आहे.पणनसंचालक डॉ.सूभाष माने यांनी बार्शी येथे कार्यक्रमानिमित्त आल्यावर राज्यातील शेतकर्‍यांना आडतमुक्क्त करणार असल्याची घोषणा करुण त्यानुसार त्यांनी राज्यातील शेतकर्‍यांना आडतमुक्त केल्याचा आदेशहि काढला होता.मात्र व्यापारी व बाजारसमित्यांचे हित जोपासत राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माने यांचे अधिकार गोठवुन त्यांच्या आदेशाला स्थगिती देत पंधरा दिवसामध्ये पुन्हा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केल्यामुळे शेतकर्‍यात असंतोष पसरला आहे.
   नायब तहसिलदार उत्तम पवार यांना निवेदन देतेवेळी राज्य युवा शेतकरी संघटनेचे  राज्य अध्यक्ष शंकर गायकवाड,वकील आघाडी प्रमुख दिनेश गायकवाड,तालुका अध्यक्ष हनुमंत भोसले,कार्याध्यक्ष तात्यासाहेब शिंदे,अरुण घायतिडक,शंकर देशमुख,संभाजी पवार,बाळासो वाळके,हनुमंत चौगुले,राजेंद्र भोसले,सुनील बिराजदार,औदुंबर मोरे,आदि शेतकरी उपस्थित होते.

 
Top