उस्मानाबाद  :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम सी. विद्यासागर राव हे जानेवारीच्या दुस-या आठवडयात उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत आहेत. यावेळी ते तुळजापूर तालुक्यातील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला भेट देऊन तेथील राष्ट्रीय ग्रामीण युवक महोत्सवास उपस्थितीत राहणार असून ते टंचाईग्रस्त भागातील गावांना भेटी देण्याही शक्यता आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची  पूर्वतयारी आढावा बैठक घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी विविध विभागांनी करावयाची तयारी आणि कार्यवाहीबाबत संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, प्रभोदय मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, टाटा सामाजिक संस्थेचे डॉ.श्रीकृष्ण सुधीर, बिपीन दास,सदानंद भोसगे, डॉ. गुणवंत बिराजदार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होती. 
यावेळी विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करतांना डॉ.नारनवरे यांनी रस्ते व हॅलीपॅड बाबत सार्वजनिक बांधकाम विभागांनी, मंदीर संस्थान, पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागांनी चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यात्रेकरुंची गर्दी व मोकाट जनावरे,  पार्कींग व्यवस्था यांचा बदोबस्त संबंधित विभागांनी करावा. आपल्याला देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावीत याबाबत प्रत्यक्ष जाऊन स्थळांची पाहणी करावी. व्यवस्थेमध्ये कोणत्याही  प्रकारची कमतरता राहू नये, यासाठी संबं‍धित विभागांनी देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करावे, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. 
यावेळी तांबे यांनी  सर्व संबंधित विभागांना देण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या.              
 
Top