तुळजापूर -: महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्‍या शाकंभरी महोत्‍सवास आज सोमवारपासून मोठ्या उत्‍साहात प्रारंभ झाला आहे. दुपारी बारा वाजता श्री तुळजाभवानी मातेच्‍या सिंहासनावर मुर्तीची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली. त्‍यानंतर मुर्तीवर पंचामृत अभिषेक करण्‍यात आला. शाकंभरी महोत्सवानिमित्त देवीची विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी मंदीर परिसर 'आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो' या जयघोषाने दुमदूमुन गेला होता. 
 
Top